मानसिक आजारांची कारणे 

१.मेंदूमधील रासायनिक घटकांचा समतोल बिघडणे (केमिकल लोचा). यामध्ये  मुख्यत  डोपामीन, सेरोटोनिन, एपिनेफ्रिन, नॉर-एपिनेफ्रिन, असिटीलकोलीन इत्यादी केमिकल ची लेवल किंवा ऍक्शन कमी होते किंवा वाढते.

२.अनुवांशिकता.

३.मेंदूच्या रचनेमध्ये होणार बदल.

४.बाल अवस्थेत किंवा नंतर होणारा मानसिक आघात.

५.मानसिक ताण-तणाव: सामजिक किंवा आर्थिक किंवा कुठल्याही कारणामुळे होणार्या ताण-तणावामुळे किंवा  एखादी खूप आनंदाची घटना घडल्यासही तो काहीजणांना सहन न झाल्यामुळे

 

मानसिक आजार व उपचार

१ . औषधोपचार विज्ञानाच्या प्रगतीमुळे आज अनेक चांगली औषधे उपलब्ध आहेत. लवकरात लवकर वेळीच  व सल्ल्याप्रमाणे उपचार पूर्ण केल्यास रुग्ण पूर्णपणे बरे होऊ शकतात किंवा त्यांचा आजार पूर्णपणे काबूत राहू शकतो.

२ . विद्युत  लहरी  उपचार : तीव्र  प्रकारच्या  आजारामध्ये  जेंव्हा  पेशंट  मारामारी  करत  असेल , स्वतःला  किंवा दुसर्याला  अपाय करत  असेल  आत्महत्या  करायचा  प्रयत्न  करत  असेल   किंव्हा औषधोपचारने  रुग्ण  बरा  होत  नसल्यास  विद्युत  लहरी  उपचार  केला  जातो . हि  एक  अतिशय  सुरक्षित  व प्रभावी  उपचार  पद्धती  आहे .

३ .मानसोपचार / समुपदेशन : औषधोपचाराने रुग्ण बरा झाल्यानंतर रुग्ण पूर्ववत होण्यासाठी मानसोपचार व समुपदेशन केले  जाते. कुटुंबाचे  समुपदेशन  करणे  हि  तेवढेच  महत्वाचे  असते . तसेच  रुग्ण  पूर्ववत  व्हावा  व  चागले  आयुष्य  जगावा  म्हणून  त्याचे  व्यावसायिक  पुनर्वसन  करणे   असते .