Category Information on illness

अनिवार्य विचार व कृती विकृती (OCD)

अनिवार्य विचार व कृती विकृती (OCD) एखाद्या प्रकारचे विचार सतत व वारंवार मनात येणे. रुग्णास माहिती असते कि हे चुकीचे विचार आहेत परंतु ते प्रयत्न करूनही थांबवू न शकणे. ते न थांबवू शकल्याने बैचेनी होणे किंवा त्रास होणे. हे विचार येऊ नयेत म्हणून रुग्ण त्या विरुद्ध विचार करायचा प्रयत्न करतो किवा मंत्र म्हणतो किंवा विशिष्ठ अशी कृती करतो. या विचारामुळे व कृती मुळे रुग्णास त्रास होतो व त्याचा बराच वेळ या गोष्टीत जातो व त्याचा दैनंदिन जीवनावर, नातेसंबंधावर, कामावर परिणाम होतो. काँटॅमिनेशन टाईप अनिवार्य विचार: सर्वत्र जंतू पसरले आहेत. आपल्या हाताला जंतू लागले आहेत. ते पोटात जातील म्हणून प्रत्येक गोष्ट

Continue readingअनिवार्य विचार व कृती विकृती (OCD)

व्यसनाधीनता

व्यसनाधीनता – एक मानसिक आजार सध्या जगामध्ये मृत्युच्या कारणांमध्ये व्यसन हे चौथ्या क्रमांकावर आहे.जगभरात दरवर्षी ८ ते १० लाख लोक फक्त तंबाकूच्या व्यसनामुळे मृत्युमुखी पडतात.आजकाल पुरुष व तरुणांबरोबरच स्त्रिया व मुले यांच्यामध्ये व्यसनांचे प्रमाण वाढत चालले आहे. व्यसनांच्या पदार्थांमध्ये मुख्यतः तंबाखू, दारू तसेच चरस,गांजा,अफू,झोपेच्या गोळ्या किंवा इतर मादक पदार्थ असू शकतात.अलीकडेच इंटरानेट व स्मार्टफोनचीही व्यसनाधीनता होऊ शकते असे म्हटले जातेय. प्रश्न :- आपण बर्याच गोष्टी वापरतो खातो ,पितो मग ठराविक गोष्टींचेच व्यसन का होते? उत्तर :- माणसांच्या मेंदूला चटक लावण्याचा एक गुणधर्म अशा पदार्थांमध्ये असतो. हे पदार्थ घेतल्यानंतर मेंदूमध्ये काही विशिष्ट रसायनांचा स्त्राव वाढतो ज्यास शास्त्रीय भाषेत इंडोजिनस ओपियोईडस म्हणतात

Continue readingव्यसनाधीनता

Copyright © 2022 Mindcare Hospital, Ratnagiri.