1. पॅरानाॅईड स्किझोफ्रेनिया

१. कानात आवाजाचे भास होणे – कोणतरी आपल्याशी किंवा आपल्याबद्धल बोलत आहे असे वाटणे. बहुधा ते वाईटच बोलतात किंवा आपल्याला शिवीगाळ करतात असे आवाज असतात. त्यामुळे रुग्ण चिडचिडपणा करतो किंवा आक्रमक होतो. काही वेळा हे आवाज त्यांना एखादी गोष्ट करण्यासाठी  सांगतात त्यामुळे रुग्ण त्या पद्धतीने वागतात जसे कि तोडफोड  करणे एखाद्याला मारणे. काही वेळा हे आवाज त्यांना आत्महत्या करायला सांगतात व त्या भरात रुग्ण आत्महत्या करतो.

२. मनात संशय येणे – कोणीतरी आपल्याविरुद्ध आहे, कोणीतरी आपल्याला किंवा आपल्या घरच्यांना मरेल असा संशय वाटणे. सर्व लोक माझ्याबद्धल बोलतात असे वाटणे . माझ्या घरामध्ये कॅमेरा लावलेला आहे, माझ्या मागे पोलीस लावलेले आहेत. कोणीतरी आपल्यावर करणी केली आहे, काळी जादू केली आहे मूठमाती  केली आहे असा संशय येतो किंवा काही वेळा आपल्या पत्नी किंवा पतीचे बाहेर संबंध आहेत असे संशय घेतो.

B डिसऑर्गनाईज्ड स्किझोफ्रेनिया

१) असंबद्ध बडबड करणे. रुग्ण काहीही बडबड करतो. त्याचा वास्तवाशी संबंध  तुटल्यामुळे तो काहीही विचित्र बोलतो. एक प्रश्न विचारला असता दुसरेच काहीतरी उत्तर देतो.  किंवा सर्व प्रश्नाला तेच तेच उत्तर देतो.एकच शब्द / वाक्य सारखा सारखा बोलतो. आपण जे विचारतो तेच तेच वाक्य परत बोलतो. नवीन नवीन शब्द बोलतो किंवा वेगळ्या भाषेत बोल्यासारखे बोलतो.

२) असंबंध वागणे / विचित्र वागणे :   रुग्ण स्वतःची काळजी घेत नाहीत. आंघोळ करत नाहीत, कपडे बदलत नाहीत दाढी किंवा केस कपात नाहीत. कचरा गोळा करतात. कपडे घालत नाहीत, काढून टाकतात. एकटे असताना किंवा स्वताशी बडबड करतात, हातवारे किंवा विचित्र हावभाव करत राहतात. ( रस्त्यावरती अशा अवस्थेत फिरणारे बरेचशे लोक गरीब किंवा भिकारी नसून ते या आजाराचे रुग्ण असतात.)

C कॅटाटोनिक स्किझोफ्रेनिया

शारीरिक हालचाल खूप कमी होते किंवा खूप प्रमाणात वाढते. ज्यावेळी हालचाल कमी होते त्यावेळी रुग्ण स्तब्ध बसून राहतो काही हालचाल करत नाही. एखाद्या स्थितीत बराच वेळ बसून राहतो किंवा पुतळ्यासारखा थांबून राहतो . ज्यावेळी हालचाल वाढते त्यावेळी विनाकारण इकडे तिकडे पळत राहतो किंवा कृती करत राहतो.

रुग्ण काहीच बोलत नाही. अगदीच शांत राहतो .

एकाच  कृती  वारंवार  करतो. विशिष्ठ लकब, विशिष्ट पद्धतीची हालचाल किंवा कृती विनाकारण व  सतत करत राहतो. चेहऱ्यावर विशिष्ट हावभाव करतो.

समोरचा जे बोलेल तेच वारंवार बोलतो किंवा कृती करेल  तीच कृती वारंवार करतो