१. रुग्णाला मनामध्ये नेहमी खिन्न निराश व उदास वाटते.

२. रुग्णाचा स्वभाव चिडखोर होतो. छोट्या छोट्या गोष्टीवरून चिडचिड होते.

३. दैनंदिन गोष्टी, आवडी निवडी छंद यामधील कुठल्याच गोष्टीत मन / लक्ष लागत नाही अथवा त्या गोष्टी कराव्याशा वाटत नाहीत.

४. रुग्णाला स्वतःहून कोणाशी बोलावे, लोकांत मिसळावे काही करावे असे वाटत नाही. या उलट त्या गोष्टी टाळतात.

५. भूक लागत नाही, खायची इच्छा होत नाही

६. झोप उशिरा लागते, झोप लागण्यापूर्वी अंथरुणावर तळमळत राहतो.

७. व्यसन चालू करतात किंवा पूर्वीच्या व्यसनात वाढ होते.

८. आत्मविश्वास नाहीसा होतो. आपण काहीच करू शकत नाही, आपला काहीच काहीच उपयोग नाही, आपली कुणीच मदत करू शकत नाही, आपल्या आयुष्यात पुढे काहीच चांगले होणार नाही अशी भावना व विचार नेहमी मनात येत राहतो.

९. वरील विचार मनात आल्यावर आपल्या जगण्यात काही अर्थ नाही असा विचार करून आपले जीवन संपवण्याचा निर्णय घेतात व आत्महत्या करतात.