डेमेन्शिया

  1. आपल्या वस्तू कुठेतरी ठेऊन विसरून जाणे.
  2. अलीकडे घडलेल्या गोष्टी लक्षात न राहणे.
  3. काही सांगितलेल्या सूचना किंवा कोणी भेटून गेलेले लक्षात न राहणे.
  4. चहा / नाष्टा / जेवण केलेले लक्षात न राहणे.
  5. सतत त्याच त्याच गोष्टीविषयी बोलणे.
  6. बाहेर गेल्यावर परत येण्याचा रस्ता न सापडणे.
  7. जवळच्या नातेवाईकांना न ओळखणे. घरातील व्यक्तींना न ओळखणे.
  8. बटन लावणे, कपडे घालणे, जेवणे या गोष्टी व्यवस्थित न करता येणे.
  9. संडास / लघवी यांच्यावर नियंत्रण न राहणे.

 

अॅडजस्टमेन्ट डिसऑर्डर

परिस्थितीत झालेला बदल झाल्यानंतर काही दिवसांत किवा महिन्यांत खालील लक्षणे चालू होणे.

  1. बेचैन वाटणे,दडपण जाणवणे.
  2. एकाग्रता कमी होणे. कामात चुका होणे.
  3. अनामिक भीती वाटणे.आत्मविश्वास कमी होणे.
  4. छोट्या छोट्या गोष्टीवर चिडचिड होणे.
  5. काही सुचत नाही असे वाटणे / गोंधळल्यासारखे होणे.
  6. उदास, निराश, हतबल वाटणे.
  7. परिस्थितीपासून पळून जाण्याचे विचार येणे.
  8. आक्रमक होणे/सैरभैर होणे.
  9. काही वेळा आत्महत्येचे विचार येणे/प्रयत्न करणे.
  10. वागण्या-बोलण्यावर नियंत्रण हरवणे.

बाळांतपणानंतरची उदासीनता

  1. बाळांतपणानंतर सतत उदास व निराश वाटणे, बेचैन वाटणे.
  2. विनाकारण रडू येणे.
  3. जेवण, इतरांशी बोलणे यांतील रस कमी होणे.
  4. छोट्याछोट्या गोष्टींवरून चिडचिड होणे.
  5. बाळाची अतिकाळजी वाटणे.
  6. बाळाची काळजी घेण्यातला रस कमी वाटणे.
  7. झोप कमी होणे.
  8. बाळाला काही होईल याची चिंता वाटणे.

बाळांतपणानंतरचे  सायकोसिस

  1. बाळांतपणानंतर काही दिवस ते काही महिन्यात सुरवात होणे – असंबंध बडबड करणे.अतिउत्तेजीत होणे, इकडेतिकडे पळणे,आक्रमक होणे. शिवीगाळ करणे.
  2. बाळाची काळजी न घेणे, बाळाला न पाजणे.
  3. बाळाला फेकून देणे किवा इजा करण्याचा प्रयत्न करणे.
  4. अंगावरचे कपडे काढणे, फेकाफेक करणे.
  5. वैयक्तिक स्वच्छता, जेवण यांकडे लक्ष नसणे.
  6. झोप कमी होणे / न झोपणे.

इंपल्स कंट्रोल डिसऑर्डर

एखादी कृती करण्याची तीव्र इच्छा होणे व व्यक्तीला स्वत:ला ते करण्यापासून परावृत्त न करता येत नाही. कृती करेपर्यंत मनामध्ये व शरीरामध्ये तणाव जाणवणे व तो वाढत जातो. कृती करताना आनंदाची अनुभूती होणे व कृती केल्यावर थोड्या वेळासाठी आनंददायी व  तणावरहित अवस्था अनुभवतो .

ट्रायकोटिलोमेनिया

  1. डोक्यावरील / भूवईवरील / पापण्यांचे केस ओढून काढण्याची तीव्र इच्छा होणे.
  2. काही वेळा काढलेले केस खाऊन टाकण्याची तीव्र इच्छा होणे.
  3. आपल्या दिसण्यावर / सौंदयावर परिणाम होत आहे हे कळूनही न थांबता येणे.

 इंटरमिटंट एक्सप्लोझीव्ह डिसऑर्डर

  1. अनियंत्रित रागाचे झटके येणे.भांडण करणे / आरडाओरडा करणे / तोडफोड करणे.
  2. शुल्लक कारणांसाठी, प्रमाणापेक्षा खूप जास्त रागाचे प्रदर्शन करणे.
  3. शांत झाल्यावर झालेल्या प्रकाराबद्दल पश्चाताप.

क्लेप्टोमेनिया 

  1. छोट्या छोट्या वस्तू चोरण्याची (उचलून खिश्यात / पर्समध्ये घालण्याची) तीव्र इच्छा होणे.
  2. हॉटेलमध्ये चमचे, रुमाल इत्यादी उचलणे. मित्राच्या, पाहुण्याच्या घरी छोट्या वस्तू उचलणे.
  3. या सर्व वस्तू खरेदी करण्याची चांगली आर्थिक स्थिती असूनही स्वत:ला न थांबवता येणे.
  4. पकडले गेल्यामुळे अपमानास्पद प्रसंगाना सामोरे जाऊनही या प्रकारे वागतच रहाणे.

डीसोसीएटीव्ह ऍम्नेशिया

  1. स्वरूपाच्या ताणाला सामोरे गेल्यास तो प्रसंग पूर्णपणे विसरणे.
  2. आयुष्यात ठराविक कालावधीची स्मृती लोप पावते किवा पूर्वायुष्य विसरून जाते.
  3. सध्या सुरु असलेल्या सर्व गोष्टीबद्दल व्यवस्थित जाणीव असतात व ते सर्व व्यवस्थित आठवते.

डीसोसीएटीव्ह फ्युग

  1. व्यक्ती आपल्या नेहमीच्या राहण्याच्या ठिकाणापासून दूर निघून जाते.
  2. आपल्या पूर्व आयुष्यातील सर्व गोष्टी विसरून जातो.
  3. नवीन नाव व व्यक्तिमत्व घेऊन तो राहायला लागतो.

डिसोसिएटिव्ह पर्सनलिटी डीसऑर्डर

  1. एकच व्यक्ती एका वेळी एका व्यक्तीमत्वासारखे तर दुसऱ्या वेळी इतर व्यक्ती असल्याप्रमाणे वागते.
  2. दोन्ही व्यक्तिमत्वाच्या लकबी, बोलण्याची पद्धत, वागणे पूर्णत: वेगळे असते.
  3. दोन्ही व्यक्तिमत्वांना दुसऱ्या व्यक्तिमत्वाची जाणीव नसते.
  4. काही ठराविक वेळी किंवा तणावाच्या परिस्थितीत एक व्यक्तिमत्व दुसऱ्या व्यक्तिमत्वात परावर्तित होते.

डिसोसिएटिव्ह स्टुपर 

  1. अचानकपणे तणावपूर्ण स्थितीशी सामना झाल्यास (उदा. जवळच्या व्यक्तीचा मृत्यू, बलात्कारासारखी घटना)व्यक्तीची सभोतालच्या परिस्थितीची जाणीव हरविते.
  2. शून्यात नजर लावून बसते.
  3. कुठल्याही प्रयत्नांना प्रतिसाद देत नाही.

अंगात येणे (ट्रान्स/पझेशन)

  1. व्यक्ती अचानकपणे दुसऱ्या व्यक्तीने ताबा मिळविल्याप्रमाणे वागायला लागते.
  2. बोलण्याचा आवाज बदलतो व मी अमुक व्यक्ती किवा अमुक देव / देवी किवा भूत / पिशाच्च आहे असे ती व्यक्ती सांगायला लागते.
  3. शरीराच्या ठराविक हालचाली करायला लागते (घुमायला लागते).
  4. काही वेळानंतर नंतर ती व्यक्ती पूर्ववत स्थितीला येते व झालेल्या गोष्टीची तिला जाणीव नसते.