मानसिक आजारांची कारणे
१.मेंदूमधील रासायनिक घटकांचा समतोल बिघडणे (केमिकल लोचा). यामध्ये मुख्यत डोपामीन, सेरोटोनिन, एपिनेफ्रिन, नॉर-एपिनेफ्रिन, असिटीलकोलीन इत्यादी केमिकल ची लेवल किंवा ऍक्शन कमी होते किंवा वाढते.
२.अनुवांशिकता.
३.मेंदूच्या रचनेमध्ये होणार बदल.
४.बाल अवस्थेत किंवा नंतर होणारा मानसिक आघात.
५.मानसिक ताण-तणाव: सामजिक किंवा आर्थिक किंवा कुठल्याही कारणामुळे होणार्या ताण-तणावामुळे किंवा एखादी खूप आनंदाची घटना घडल्यासही तो काहीजणांना सहन न झाल्यामुळे
मानसिक आजार व उपचार
१ . औषधोपचार विज्ञानाच्या प्रगतीमुळे आज अनेक चांगली औषधे उपलब्ध आहेत. लवकरात लवकर वेळीच व सल्ल्याप्रमाणे उपचार पूर्ण केल्यास रुग्ण पूर्णपणे बरे होऊ शकतात किंवा त्यांचा आजार पूर्णपणे काबूत राहू शकतो.
२ . विद्युत लहरी उपचार : तीव्र प्रकारच्या आजारामध्ये जेंव्हा पेशंट मारामारी करत असेल , स्वतःला किंवा दुसर्याला अपाय करत असेल आत्महत्या करायचा प्रयत्न करत असेल किंव्हा औषधोपचारने रुग्ण बरा होत नसल्यास विद्युत लहरी उपचार केला जातो . हि एक अतिशय सुरक्षित व प्रभावी उपचार पद्धती आहे .
३ .मानसोपचार / समुपदेशन : औषधोपचाराने रुग्ण बरा झाल्यानंतर रुग्ण पूर्ववत होण्यासाठी मानसोपचार व समुपदेशन केले जाते. कुटुंबाचे समुपदेशन करणे हि तेवढेच महत्वाचे असते . तसेच रुग्ण पूर्ववत व्हावा व चागले आयुष्य जगावा म्हणून त्याचे व्यावसायिक पुनर्वसन करणे असते .