सोमॅटोफाॅर्म डिसऑर्डर रुग्ण एक किवा अनेक शारीरिक लक्षणे सांगतो परंतु वैद्यकीय दृष्ट्या लक्षणे कोणत्याच शारीरिक आजार असल्याची शक्यता दर्शवत नाहीत. रुग्ण सांगत असलेल्या लक्षणाप्रमाणे सर्व शारीरिक तपासण्या, रक्त तपासण्या व इतर तपासण्या ( सिटी स्कॅन / एम आर आय ) करूनही कुठलाही शारीरिक आजार असल्याचे दिसून येत नाही. मुख्यतः हे लक्षणे तणावाच्या परिस्थितीत सुरु झालेली असतात व तणावामुळे ती तशीच राहतात किंवा वाढत जातात. शारीरिक आजाराच्या औषध उपचाराने थोडा वेळ बरे वाटू शकते परंतु तो त्रास पूर्णपणे व कायमस्वरूपी कमी होत नाही. सोमटायझेशन डिसऑर्डर एकापेश्या अनेक शारीरिक तक्रारी ज्यांच्यासाठी नेहमी वैद्यकीय मदत घेतली जाते किंवा त्याचा काम व नातेसंबंधावर परिणाम
अनिवार्य विचार व कृती विकृती (OCD)

अनिवार्य विचार व कृती विकृती (OCD) एखाद्या प्रकारचे विचार सतत व वारंवार मनात येणे. रुग्णास माहिती असते कि हे चुकीचे विचार आहेत परंतु ते प्रयत्न करूनही थांबवू न शकणे. ते न थांबवू शकल्याने बैचेनी होणे किंवा त्रास होणे. हे विचार येऊ नयेत म्हणून रुग्ण त्या विरुद्ध विचार करायचा प्रयत्न करतो किवा मंत्र म्हणतो किंवा विशिष्ठ अशी कृती करतो. या विचारामुळे व कृती मुळे रुग्णास त्रास होतो व त्याचा बराच वेळ या गोष्टीत जातो व त्याचा दैनंदिन जीवनावर, नातेसंबंधावर, कामावर परिणाम होतो. काँटॅमिनेशन टाईप अनिवार्य विचार: सर्वत्र जंतू पसरले आहेत. आपल्या हाताला जंतू लागले आहेत. ते पोटात जातील म्हणून प्रत्येक गोष्ट
व्दिध्रुवीय अवस्था

एकाच रुग्णामध्ये उन्माद व उदासीनतेचा आजार होणे. मॅनिया (उन्माद) 1.अतिशय खुश वाटणे किंवा चिडचिड वाटणे. 2.स्वतः बद्धल मोठे विचार करणे / स्वतःला मोठे समजणे. मोठ्या मोठ्या गोष्टी (बाता) करणे. मी देव आहे,मी हिरो आहे,माझ्याकडे खूप पैसे आहेत इ. 3.झोप कमी होणे.(कमी झोपणे, झोपेची गरज नाही असे वाटणे थोडीशीच झोप पुरेशी आहे असे वाटणे.) 4.नेहमीपेक्षा जास्तीची बडबड करणे,अनोळखी लोकांशी जास्तीच्या गप्पा मारणे,सतत बोलत राहणे. इंग्लिश मध्ये बोलायला चालू करणे. 5.सतत विषय बदलणे ज्यामुळे तो काय बोलतोय ते न कळणे. 6.जास्तीचे प्लांनिंग करणे,क्रिया करणे.मूर्खपणें बिजनेस मध्ये पैसे गुंतवणे,विनाकारण खर्च करणे, उधळपट्टी करणे,अचानक समाजसेवा करायला लागणे. 7.मानसिक विचार व शारीरिक क्रियांची गती वाढणे.
मॅनिया (उन्माद)
1.अतिशय खुश वाटणे किंवा चिडचिड वाटणे. 2.स्वतः बद्धल मोठे विचार करणे / स्वतःला मोठे समजणे. मोठ्या मोठ्या गोष्टी (बाता) करणे. मी देव आहे,मी हिरो आहे,माझ्याकडे खूप पैसे आहेत इ. 3.झोप कमी होणे.(कमी झोपणे, झोपेची गरज नाही असे वाटणे थोडीशीच झोप पुरेशी आहे असे वाटणे.) 4.नेहमीपेक्षा जास्तीची बडबड करणे,अनोळखी लोकांशी जास्तीच्या गप्पा मारणे,सतत बोलत राहणे. इंग्लिश मध्ये बोलायला चालू करणे. 5.सतत विषय बदलणे ज्यामुळे तो काय बोलतोय ते न कळणे. 6.जास्तीचे प्लांनिंग करणे,क्रिया करणे.मूर्खपणें बिजनेस मध्ये पैसे गुंतवणे,विनाकारण खर्च करणे, उधळपट्टी करणे,अचानक समाजसेवा करायला लागणे. 7.मानसिक विचार व शारीरिक क्रियांची गती वाढणे. नाचणे, गाणी म्हणणे. 8.धोकादायक क्रिया वाढणे- दारू किंवा इतर
व्यसनाधीनता

व्यसनाधीनता – एक मानसिक आजार सध्या जगामध्ये मृत्युच्या कारणांमध्ये व्यसन हे चौथ्या क्रमांकावर आहे.जगभरात दरवर्षी ८ ते १० लाख लोक फक्त तंबाकूच्या व्यसनामुळे मृत्युमुखी पडतात.आजकाल पुरुष व तरुणांबरोबरच स्त्रिया व मुले यांच्यामध्ये व्यसनांचे प्रमाण वाढत चालले आहे. व्यसनांच्या पदार्थांमध्ये मुख्यतः तंबाखू, दारू तसेच चरस,गांजा,अफू,झोपेच्या गोळ्या किंवा इतर मादक पदार्थ असू शकतात.अलीकडेच इंटरानेट व स्मार्टफोनचीही व्यसनाधीनता होऊ शकते असे म्हटले जातेय. प्रश्न :- आपण बर्याच गोष्टी वापरतो खातो ,पितो मग ठराविक गोष्टींचेच व्यसन का होते? उत्तर :- माणसांच्या मेंदूला चटक लावण्याचा एक गुणधर्म अशा पदार्थांमध्ये असतो. हे पदार्थ घेतल्यानंतर मेंदूमध्ये काही विशिष्ट रसायनांचा स्त्राव वाढतो ज्यास शास्त्रीय भाषेत इंडोजिनस ओपियोईडस म्हणतात
ABOUT DR ATUL DHAGE in Media

Suicide in Children / मुलांमधील आत्महत्या

Sexual Problems / लैंगिक समस्या

Depression / नैराश्य / उदासीनता

schizophrenia / स्किझोफ्रेनिया
Daily Prahar and Ratnagiri times dated 5th June 2017