सोमॅटोफाॅर्म डिसऑर्डर

सोमॅटोफाॅर्म डिसऑर्डर

सोमॅटोफाॅर्म डिसऑर्डर

रुग्ण एक किवा अनेक शारीरिक लक्षणे सांगतो परंतु वैद्यकीय दृष्ट्या लक्षणे कोणत्याच शारीरिक आजार असल्याची शक्यता दर्शवत नाहीत.

रुग्ण सांगत असलेल्या लक्षणाप्रमाणे सर्व शारीरिक तपासण्या, रक्त तपासण्या व इतर तपासण्या ( सिटी स्कॅन / एम आर आय ) करूनही कुठलाही शारीरिक आजार असल्याचे दिसून  येत नाही.

मुख्यतः हे लक्षणे तणावाच्या परिस्थितीत सुरु झालेली असतात व तणावामुळे ती तशीच राहतात किंवा वाढत जातात.

शारीरिक आजाराच्या औषध उपचाराने थोडा वेळ बरे वाटू शकते परंतु तो त्रास पूर्णपणे व कायमस्वरूपी कमी होत नाही.

सोमटायझेशन डिसऑर्डर

एकापेश्या अनेक शारीरिक तक्रारी ज्यांच्यासाठी नेहमी वैद्यकीय  मदत घेतली जाते किंवा त्याचा काम व नातेसंबंधावर परिणाम होतो.

 1. दुखण्याची लक्षणे (कमीत कमी चार): डोके,पोट,पाठ,सांध्ये,हातपाय,छाती,पाळीच्या वेळी,लैगिक सबंधाच्या वेळी किवा लघवी करताना.
 2. पचनसंस्थेशी निगडीत लक्षणे (कमीत कमी दोन): मळमळ,उलटी, ढेकर येणे, शौचास लागणे, अन्नपचन न होणे.
 3. लैंगिक लक्षणे (कमीत कमी एक):लैंगिक इच्छा न होणे, शीघ्रपतन, ताठरता न येणे, अनियमित पाळी, अंगावर जास्त जाणे.
 4. मज्जासंस्थेशी निगडीत लक्षणे: बोलता न येणे, डबल दिसणे, आंधळेपणा , ऐकू न येणे, झटके येणे बेशुद्ध पडणे, भास होणे, स्मृती हरवणे.

सोमॅटोफॉर्म पेन डिसऑर्डर

एका किंवा अनेक जागेचे दुखणे ज्यामुळे त्या व्यक्तीस खूप त्रास होतो व त्याच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होतो.

बॉडी डिसमॉर्फिक डिसऑर्डर

 1. आपल्या दिसण्याविषयी गरजेपेक्षा जास्त जागरूक असणे.
 2. आपल्या शरीराचा विशेषतः चेहऱ्याचा भाग विचित्र दिसतो अशी भावना असणे व सतत त्याच विचारात असणे
 3. या काल्पनिक विचारामुळे सतत बेचैन किंवा उदास वाटणे.वारंवार व विविध डॉक्टरांना दाखवणे व प्लास्टिक सर्जरी बाबत बोलणे.

हिस्टेरिया / कन्व्हर्जन डिसऑर्डर

काही तणावाची घटना घडल्यास किंवा तणाव असल्यास खालील पैकी कुठलेही एक लक्षण दिसणे.

 1. चक्कर येणे / बेशुद्ध पडणे
 2. दातखीळ बसने
 3. उभे न राहता येणे
 4. बोलता न येणे
 5. श्वास न घेता येणे
 6. हातापायातली ताकत जाणे / लकवा मारणे
 7. आंधळे होणे / ऐकू न येणे
 8. फिट्स सारखे झटके येणे

हायपोकाँड्रियासिस

 1. आपल्याला कुठला तरी मोठा आजार ( कँसर, हृदयाचा आजार, एड्स) झाला आहे अशी भीती वाटणे व त्या प्रकारची लक्षणे जाणवणे.
 2. मेडिकल रिपोर्ट नॉर्मल असूनही त्यावर विश्वास न बसने, व सतत डॉकटर बदलत राहणे व सतत तपासण्या करणे)
Copyright © 2022 Mindcare Hospital, Ratnagiri.