मॅनिया (उन्माद)

मॅनिया (उन्माद)

1.अतिशय खुश वाटणे किंवा चिडचिड वाटणे.

2.स्वतः बद्धल मोठे विचार करणे / स्वतःला मोठे समजणे. मोठ्या मोठ्या गोष्टी (बाता) करणे. मी देव आहे,मी हिरो आहे,माझ्याकडे खूप पैसे आहेत इ.

3.झोप कमी होणे.(कमी झोपणे, झोपेची गरज नाही असे वाटणे थोडीशीच झोप पुरेशी आहे असे वाटणे.)

4.नेहमीपेक्षा जास्तीची बडबड करणे,अनोळखी लोकांशी जास्तीच्या गप्पा मारणे,सतत बोलत राहणे. इंग्लिश मध्ये बोलायला चालू करणे.

5.सतत विषय बदलणे ज्यामुळे तो काय बोलतोय ते न कळणे.

6.जास्तीचे प्लांनिंग करणे,क्रिया करणे.मूर्खपणें  बिजनेस मध्ये पैसे गुंतवणे,विनाकारण खर्च करणे, उधळपट्टी करणे,अचानक समाजसेवा करायला लागणे.

7.मानसिक विचार व शारीरिक क्रियांची गती वाढणे. नाचणे, गाणी म्हणणे.

8.धोकादायक क्रिया वाढणे- दारू किंवा इतर व्यसन, लग्नबाह्य  संबंध,अति वेगाने गाडी चालवणे.

Copyright © 2022 Mindcare Hospital, Ratnagiri.