अनिवार्य विचार व कृती विकृती (OCD)

अनिवार्य विचार व कृती विकृती (OCD)

अनिवार्य विचार व कृती विकृती (OCD)

अनिवार्य विचार कृती विकृती (OCD)

  1. एखाद्या प्रकारचे विचार सतत व वारंवार मनात येणे.
  2. रुग्णास माहिती असते कि हे चुकीचे विचार आहेत परंतु ते प्रयत्न करूनही थांबवू न शकणे.
  3. ते न थांबवू शकल्याने बैचेनी होणे किंवा त्रास होणे.
  4. हे विचार येऊ नयेत म्हणून रुग्ण त्या विरुद्ध विचार करायचा प्रयत्न करतो किवा मंत्र म्हणतो किंवा विशिष्ठ अशी कृती करतो.
  5. या विचारामुळे व कृती मुळे रुग्णास त्रास होतो व त्याचा बराच वेळ या गोष्टीत जातो व त्याचा दैनंदिन जीवनावर, नातेसंबंधावर, कामावर परिणाम होतो.
  1. काँटॅमिनेशन टाईप

अनिवार्य विचार: सर्वत्र जंतू पसरले आहेत. आपल्या हाताला जंतू लागले आहेत. ते पोटात जातील म्हणून प्रत्येक गोष्ट केल्या नंतर किंवा सहजासहजी त्याच्या मनात हे विचार येतात. आपल्या हाताला घाण लागलेली आहे किंवा सर्व वस्तुंना घाण लागलेली आहे. आपण जर त्याला हात लावला किंवा आपल्या संपर्कात आली तर त्याचे जंतू किंवा घाण आपल्या हातास किंवा अंगास लागेल असे वाटते.

अनिवार्य कृती : वारंवार / सतत हात धुणे / सतत साबण वापरणे. आंघोळ करताना, कपडे धुताना, भांडी धुण्यासाठी खूप वेळ लावणे. स्वच्छता ठेवण्याचा प्रयत्न करणे. सतत ग्लोव्हस किंवा सॉक्स वापरणे. जेवणाचे एकदम छोटे छोटे घास करून त्यात काही घाण आहे का पाहणे.

 

  1. इन्ट्रुजिव्ह थॉट टाईप (अनाहूत विचार)

अनिवार्य विचार:  अतिप्रमाणात  लैंगिक  कृतीचे  किंवा  आक्रमकतेचे  विचार  मनात  येतात . ( आपण  कोणाला  तरी  मारावे  / शिवीगाळ  करावी  किंवा  आपल्या  घरच्यांना  किंवा  समोरच्याला   काही  तरी  बरे  वाईट  होईल  ). बऱ्याच  वेळा  हे  विचार  देव  देवता  बाबतचे  असू  शकतात . रुग्णास  माहीत  असते  की  हे  चुकीचे  आहे  त्याचा  त्याला  त्रास  होतो.

अनिवार्य कृती : तो या विचारावर नियंत्रण करण्यासाठी तो मंत्र म्हणतो किंवा नमस्कार करतो किंवा एखादी विशिष्ट कृती करतो. ही कृती किंवा मंत्र ही ठराविक वेळा ( दहा  वेळा /पंधरा  वेळा ) म्हंटल पाहिजे असे त्याला वाटते. जर एक वेळी कमी केल्यास किंवा जास्त केल्यास त्याला बैचेनी वाटते. व काळजीचे लक्षणे दिसून येतात. म्हणूनच अनिवार्य विचार व कृती विकृतीस मंत्रचळेपणा असेही म्हंटले जाते.

  1. पॅथॉलॉजिकल डाऊट टाईप ( विकृतिस्पद शंका ) अनिवार्य विचार: मनामध्ये नाना शंका निर्माण होतात. मी गॅस बंद करायला विसरलो काय? दरवाजा बंद केला आहे काय?  मी पैसे व्यवस्थित मोजले आहेत काय?  मी हे काम बरोबर केले आहे की नाही?

अनिवार्य कृती : रुग्ण वारंवार चेक/तपास करत राहतो. विचार काय आहेत त्यानुसार रुग्ण एखादी कृती सतत करतो. सतत गॅस चेक करणे. सतत दरवाजा/कुलूप चेक करणे. वारंवार पैसे मोजणे. काम बरोबर केले आहे की नाही सतत तपासात बसने. यामध्ये रुग्णाचा बराच वेळ या गोष्टीत जातो. व त्याचा त्याच्या दैनंदिन जीवनावर, व्यवसायिक जीवनावर व नाते संबंधावरवर परिणाम  होतो.

 

Copyright © 2022 Mindcare Hospital, Ratnagiri.