वर्तन समस्या (Behavioural Disorders)

  1. सतत खोड्या करणे. सर्वसाधारण नियम न पाळणे.इतरांचे न ऐकणे.
  2. उलटे बोलणे /शिवीगाळ करणे. भांडणे करणे /मारामाऱ्या करणे. विनाकारण इतरांना त्रास देणे, छेड काढणे.
  3. नेहमी कशाचीतरी मागणी करत राहणे. मागणी पूर्ण न झाल्यावर आक्रमक होणे/ तोडफोड करणे.

अवधानाची कमतरता व अतिचंचलता (ADHD)

  1. अभ्यासात लक्ष केंद्रित न करु शकणे किंवा लक्ष नसल्यामुळे चुका होणे.
  2. कुठलीही कृती करताना जास्त वेळ लक्ष न देता येणे.
  3. दिलेल्या सूचना न पाळणे किंवा दिलेल्या अभ्यास/काम पूर्ण न करणे.
  4. ज्याच्यामध्ये जास्त वेळ लक्ष देऊन काम करावे लागते अशा गोष्टी टाळणे.
  5. सतत वस्तू हरविणे /सांभाळून न ठेवता सतत हातापायाशी चाला करणे किंवा बसल्या जागी चुळबूळ करणे.वर्गात नेहमी आपली जागा सोडून दुसरीकडे जाणे.
  6. शांतपणे एखादया ठिकाणी न खेळणे.
  7. प्रमाणापेक्षा जास्त बडबड करणे.
  8. खेळताना किंवा काही घेण्यासाठी आपली पाळी येण्यासाठी वाट न पाहू शकणे सतत दुसऱ्यांच्या मध्येमध्ये करणे.

रीडिंग डिसऑर्डर (डिस्लेक्सिया)

  1. अडखळत वाचणे.
  2. वाचण्याची गती खूप कमी असणे.
  3. स्पष्ट उच्चार नसणे.
  4. वाक्य अर्धवट वाचणे/चुकीच्या पद्धतीने वाचणे.
  5. मधले शब्द गाळणे.
  6. वाचल्यानंतर त्याचा अर्थबोध न होणे.

रायटिंग डिसऑर्डर (डिसग्राफीया)

  1. लिहताना खूप चुका करणे [काना,मात्रा,उकार ,वेलांटी].
  2. साधी साधी वाक्ये लिहिणे.
  3. सारख्या उच्चाराचे शब्द लिहिताना चुका करणे.
  4. अक्षरे उलटी लिहिणे.
  5. शब्द किंवा वाक्ये अर्धवट लिहिणे.
  6. लिहायला जास्त वेळ लागणे.

डिसकॅल्क्युलिया

  1. आकडे व चिन्ह समजून न घेता येणे.
  2. लेखी प्रश्नावरून योग्य गणिती प्रक्रिया न समजणे.

स्वमग्नता / ऑटीजम

  1. सामाजिक संबंधामध्ये अडचण भावना न जाणवणे. जवळच्या व्य्क्तीबद्धल [आई /वडील]प्रेम न वाटणे.
  2. इतरांकडे अनोळखी चेहऱ्याने पाहणे. प्रतिसाद न देणे.
  3. निर्जीव खेळण्यांमध्ये रमणे. मुलांमध्ये न मिसळणे /एकटे एकटे राहणे.
  4. संवादामध्ये अडचण – उशिरा बोलायला शिकणे किंवा बोलता न येणे. पूर्ण वाक्यामध्ये न बोलणे किंवा तुटकपणे बोलणे. तोतरेपणा/तेच तेच शब्द परत उच्चारणे.
  5. इतर लक्षणे-रुटीनमध्ये व वातावरणात बदल न आवडणे. एकच कृती वारंवार करत राहणे.सतत मागेपुढे होणे[रॉकिंग]. स्वत:भोवती गिरक्या घेणे /भिंतीवर डोके आपटणे.