शारीरिक हालचालींची फिट: मुठी आवळणे. हातापायाला झटके देणे. डोळे पांढरे होणे. दातखीळ बसणे/फेस येणे. जीभ चावणे. कपड्यांमध्ये लघवी/संडास होणे. बेशुद्ध होणे. शुद्धीवर आल्यावर थोडा वेळ गोंधळल्यासारखे होणे/कोणाला न ओळखणे. झालेल्या घटनेची कुठलीच स्मृती नसणे.

अबसेन्स फिट: अचानकपणे काही सेंकद ते काही मिनिटांसाठी स्तब्ध होणे व भवतालचे भान नसणे. शुद्धीवर आल्यावर असे झाले होते हे स्वत:च्या लक्षात न येणे.

कॉम्प्लेक्स पार्शिअल  फिट: अचानकपणे विचित्र वागायला सुरवात. इकडेतिकडे पळणे/ओरडणे/आक्रमक होणे. स्वत:ला किंवा इतरांना इजा करणे. त्यावेळी इतरांना न ओळखणे/परीस्थीतिचे भान नसणे. शुद्धीवर आल्यावर झालेल्या गोष्टी न आठवणे.

फिटसमुळे मानसिक आजार : फिट येण्यापूर्वी, फिटदरम्यान, फिट्स नंतर वेड्यासारखे